गाझातील आश्रयस्थानावर इस्रायलच्या हल्ला; १६ जणांचा मृत्यू   

खान युनूस, (गाझा पट्टी) : गाझा पट्टीतील जबालिया परिसरात एका आश्रयस्थानावर सोमवारी सकाळी इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच मुले आणि चार महिलांचा समावेश आहे.तथापि, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, आम्ही केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. सामान्य नागरिकांच्या मृत्यूसाठी हमास जबाबदार आहे. कारण  हमास दहशतवादी दाट लोकवस्तीच्या भागात कार्यरत आहेत.  
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार असताना हा हल्ला झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी युद्धबंदी संपल्यानंतर इस्रायलने गाझामधील युद्ध तीव्र केले आहे. गेल्या १० आठवड्यांपासून या प्रदेशात अन्न, औषध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या नाकाबंदीमुळे मानवीय संकट अधिकच गडद होत चालले आहे.

Related Articles